राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल पाटील यांच्या निवडीची शक्यता

यावल-अय्यूब पटेल | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी येथील माजी नगराध्यक्ष तथा पक्षाचे लोकसभा प्रमुख अतुल वसंतराव पाटील यांच्या निवडीची शक्यता असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्षपदी यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांची वर्णी लागल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटील यांनी काही दिवसापुर्वी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असुन , दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित जळगाव येथे झालेल्या पक्षा अंतर्गत झालेल्या बैठकीय पक्षाच्या रिक्त झालेल्या जिल्हा अध्यक्षपदा करीता आगामी काळात होवु घात असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा अध्यक्षपदाच्या काही नांव पुढे आली होती.

दरम्यान दोन जिल्हा अध्यक्ष देण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकहून मागणी समोर येत होती , या मागणीला पक्षाच्या वतीने होकार देण्यात आला असुन , जळगाव जिल्ह्यासाठी दोन जिल्हा अध्यक्ष देण्यात येणार असुन,यात यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष , यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक व एक अभ्यासु वृत्तीचे व्यक्तीमत्व असलेले पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल वसंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी शिकामोर्तब झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.

या संदर्भात अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,आपल्याला पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून या बाबत विचारणा करण्यात आली असल्याचे सांगीतले. मात्र निवडीचे अधिकृत पत्र आपणास अद्याप पक्षाकडुन प्राप्त झाले नसल्याचे अतुल पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधी बोलतांना सांगीतले .

Protected Content