पोर्श कार अपघातप्रकरणी कुणालाही सोडणार नाही – देवेंद्र फडणवीस

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांनाही उडवलं. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. ताशी १६० किमीच्या वेगात हा अल्पवयीन मुलगा पोर्श कार चालवत होता.

१९ मेच्या पहाटे ही घटना घडली. या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या प्रकरणात सुरुवातीला मुलाला जामीन मिळाला होता. मात्र या घटनेबाबत रोष व्यक्त झाल्यानंतर या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली. तसंेच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यापैकी कुणालाही सोडणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Protected Content