पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे वेल्हाणे खुर्द येथील मुतारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामांची चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे. त्यांनी या संदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी व पारोळा गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

पारोळा तालुक्यातील मौजे वेल्हाणे खुर्द या गावी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ बांधकाम झालेली मुतारी काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्याची तत्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच गावाचे सरपंच व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. कारण मुतारीचे बांधकाम काम एस्टीमेटमध्ये आर.सी. सी. करणे अपेक्षित असतांना हे बांधकाम लोड बेलिंगमध्ये करण्यात आले आहे. तरी संबंधित कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वेल्हाणे गावातील ग्रामस्थ मुरलीधर शामराव पाटील, बाळासाहेब हेमराज पाटील, अभिषेक ज्ञानेश्वर पाटील यांनी यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पारोळा गटविकास अधिकारी यांना पत्रद्वारे केली आहे.




