यावल तालुक्यातील रस्त्यांची दयनिय अवस्था; दुरूस्तीची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथून चुंचाळे बोराळे गावाकडे जाणारा रस्त्याची मागील अनेक दिवसांपासुन अत्यंत दयनीय अवस्था झालेली असुन तर दहिगाव हुन विरावली कडे जाणारा रस्ता डांबरीकरणाच्या मोठ्या प्रतीक्षेत आहे. लोकप्रतिनिधींनी या ग्रामीण क्षेत्रांकडील मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

रस्त्यावरून वाहने चालवणे फार कठीण झालेले असल्याने ग्रामस्थांमध्ये लोकप्रतिनिधींच्या कारभारा विषयी संताप व प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तरी देखील या प्रश्नाकडे प्रशासन हे हेतुपुरस्पर दुर्लक्ष तर होत नाही ना अशी भावना निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून दहीगाव चुंचाळे व दहिगाव विरावती हा शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला रस्ता अत्यंत खराब झालेला असुन या रस्त्यावरून वाहने चालवणे अतिशय कठीण व जिकरीचे झालेले असल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सदरचा हा रस्ता दुरुस्त होऊन तो संबंधितांनी कागदपत्रांवर पुर्ण झालेला दाखविलेल्या असावा असा आरोप काही ग्रामस्थ व नागरिक करीत आहेत त्यामुळे या रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करून देखील या रस्त्याच्या कामास होण्यास विलंब का होत आहे असे बोलले जात आहे या रस्त्यावरून किनगाव जळगाव चोपडा या मार्गावर जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्यामुळे हा रस्ता होणे फार गरजेचे आहे तसेच विरावली दहिगाव रस्ता अनेक वर्षापासून होत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे.

याच दरम्यान विरावली कोरपावली मोहराळा रस्ता अनेक वेळा होऊन तो सुशोभित होत आहे तर दहिगाव रस्त्याचे काम अद्यापही सुरू होत नसल्याने दहिगाव विरावली कर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत त्याचप्रमाणे उघडा सीम नायगाव या रस्त्यावरूनही हरीपुरा मोहराळा सावखेडा सिम दहिगाव नायगाव या गावकऱ्यांचे जाणे-येणे तसेच जळगाव धुळे या मार्गावर  जाणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असुन , आता तरी लोकप्रतिनिधींनी या ग्रामीण क्षेत्रांकडील मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

 

Protected Content