पहूर जुगार अड्डा धाड प्रकरण : चौघांना एक दिवसाची पोलीस कोठडी ; सपोनि शिरसाठ यांची बदली

jugar

 

पहूर ता . जामनेर (रविंद्र लाठे) पहूर पेठ येथील बडामोहल्ला परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून अटक केलेल्या पाचही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळालीय. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दरम्यान एका आरोपीच्या घरून धारदार तलवारही जप्त करण्यात आली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, काल सायंकाळी पहूर पेठेतीत बडा मोहल्ला येथे स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अडयावर धाड टाकली होती. यात माजी उपसरपंच इकरामोद्दीन समसुद्दीन ( वय ५८ ) , शाहिस्तेखान राहिम खान पठाण ( वय ४६ ), रसुलखान रहिम खान पठाण ( वय ५o ) , इकबाल शेख लतीफ शेख ( वय ३२ ) , सय्यद अमिर सै . गुलाब ( वय ५२ रा . सर्व पहूर पेठ ,बडामोहल्ला) यांना अटक करण्यात आली होती. यावेळी जुगारींनी घटनास्थळी पोलीसांशी हूज्जत घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या विजय पाटील यांच्याशी धक्काबुक्की केली होती. त्यात त्यांचे शर्ट फाटले होते. घटनास्थळी जमलेल्या सात – आठ जणांनी आरडाओरडा करून कर्मचाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महीला पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली महाजन यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता. संबधीत महीलांनी त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली.  दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांची जळगाव येथे नियंत्रण कक्षात तडकाफडकी रवानगी करण्यात आली असून तात्पुरता पदभार पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बागुल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Protected Content