अमळनेर (प्रतिनिधी) विधानपरिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ व भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आज समर्थकांसह अमळनेर तालुक्यात मतदान केले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन नंतर उमेदवारी कापण्यात आल्यामुळे वाघ दापत्य नाराज होते. परंतु प्रारंभीच्या नाराजीनंतर वाघ दांपत्य शेवटच्या दिवसांमध्ये प्रचारात चांगलेच सक्रिय झाले होते. मागील आठ दिवसांपासून तणावात असलेले उदय वाघ यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे हास्य दिसून आले. यावेळी वाघ दाम्पत्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.