यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्याच्या संपूर्ण सहकार चळवळीचे लक्ष लागून असलेल्या यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षीक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण शशिकांत चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याने उर्वरीत १६ संचालक मंडळाच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी काँग्रेस, शिवसेना उबाठा व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रणीत शेतकरी विकास पॅनल यांच्या व शिंदे गट शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, भाजपा व रिपाईच्या महायुती प्रणीत सहकारी पॅनल उमेदवारांमध्ये उमेदवार निवडीकरीता ४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
यावल तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री सहकारी संघाच्या १६ संचालक पदाच्या निवडीसाठी ४ फेबुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पॅनलमध्ये लढत होत असुन, दोन्ही पॅनलचे एकुण ३१ इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यासाठी ४ फेब्रुवारी रोजी यावलच्या माध्यमिक कन्या शाळेत होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानात दोन हजार ८२५ तर सोसायटी मतदारसंघातून ४८ मतदार हे सात मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान या निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती या निवडणुकीचे निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांनी प्रस्तुत माध्यमांना दिली आहे.