मतदान केंद्रात मतदानासाठी सकाळपासूनच गर्दी: अनेक दिग्गजांनी बजावला आपल्या मतदानाचा हक्क

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूकीसाठी सोमवारी १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरूवात करण्यात आली आहे. कडक उन्हाळ्याचा फटका बसू नये यासाठी महिला व वयोवृध्दांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. जळगाव शहरातील सेंट जोसेफ, ओरीएन्ट स्कूल, आर.आर. विद्यालयातील मतदान केंद्रात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

जिल्ह्यात आज लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाला आज सोमवारी १३ मे रोजी मतदानाला सुरूवात करण्यात आली आहे. जळगाव शहरातील प्रमुख मतदान केंद्रांवर मान्यवरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. रावेर लोकसभेचे उमेदवार रक्षा खडसे, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे, मंदाताई खडसे यांनी सकाळीच मतदान केले. दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, पारोळा येथे माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्या सहकुटुंब मतदान केले. आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या कुटुंबासह सौ.रत्ना जैन प्राथमिक विद्यालय येथील मतदान केंद्रात आपल्या मतदानाचा हक्कबजावला, तर उद्योजक अशोकभाऊ जैन यांनी ओरीएन्ट स्कूल येथे मतदान केले. यासह शहरातील मान्यवरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचे पहायला मिळाले.

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी ही निवडणूक लढविण्यात येत आहे. त्यामुळे दोनही लोकसभा मतदार संघातील मतदारांकडून मतदान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. या महिला आणि वयोवृध्द यांनी मतदान करण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरूवात केली आहे. दुपारी जळगाव जिल्ह्याचे तापमान हे ४० अंशाहून अधिक वाढत असल्याने अनेकांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले आहे.

Protected Content