Home Cities यावल फैजपूरमध्ये राजकीय वाऱ्यांना वेग : रज्जाक भाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, शहराध्यक्षपदी दमदार प्रवेश

फैजपूरमध्ये राजकीय वाऱ्यांना वेग : रज्जाक भाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, शहराध्यक्षपदी दमदार प्रवेश


सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथे आजच्या राजकीय घडामोडींमध्ये मोठा वळण आला, जेव्हा रज्जाक भाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशासह पक्षाकडून त्यांच्यावर विश्वास दाखवत फैजपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांच्या या निवडीने फैजपूरसह संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

रज्जाक भाई यांच्या पक्षप्रवेशाचा आणि नियुक्तीचा कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश  नेमाडे यांच्या हस्ते रज्जाक भाई यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. त्यांच्या सोबत कुर्बान मेंबर, संतोषभाऊ दाढी, फारूकभाई, मोहसीन युनुस खान, मेंबर जफर अली, उजेफ खान यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांनी नव्या शहराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि पक्षाच्या कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

रज्जाक भाई यांच्या या निवडीवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिभाताई शिंदे, संजय नाना पवार, राजेशभाऊ वानखडे, भगतसिंग बापू, योगेश दादा देसले, रविनाना शेख, नासिर भाई, हाजी हारून सेट, अलीम भाई, शेर खान, कादिर भाई आदी मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फैजपूर शहर व परिसरात रज्जाक भाई यांच्या नेमणुकीने राजकीय उलथापालथीची नांदी झाली असून, नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे. शरीफ सर, फारूक वार्ताहर, अवैस भांजा, ताहीर खाटिक, रहीम सर, रशीद मेंबर, अजीम मेंबर, रईस खान सर, अरमान तडवी, बिलाल शेख यांच्यासह अनेकांनी स्वागत करून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये रज्जाक भाई यांचा प्रवेश हा केवळ व्यक्तिकेंद्रित नसून, फैजपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात पक्ष संघटनेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी भावना जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.


Protected Content

Play sound