यावल पोलिसांनी पकडला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर

यावल प्रतिनिधी । येथे पोलिसांनी बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला अटक केली असून डंपर जप्त केला आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या बेकाद्याशीर विनापरवाना वाळुची चोरटी वाहतुक करण्यात येत असुन , पोलीसांनी पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पकडले वाळुची वाहतुक करणारे डंपर पकडल्याने चर्चेला उधाण आले आहे . काल रात्री १ वाजेच्या सुमारास यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर गस्तीवर असलेल्या यावल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण यांनी एमएच १९ सिवाय ८१८१या क्रमांकाच्या डंपर या चार चाकी वाहनातुन चालक बाशन युवराज कोळी वय२५ वर्ष राहणार डांभुणी हा विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना आढळुन आला. पोलीसांनी सुमारे ५ लाखाहुन अधिक किमतीचा डंपरला ताब्यात घेतले असुन , वाहनचालका विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे वाळुची चोरटी वाहतुक करतांना वाहन ताब्यात घेतल्याची ही दुसरी घटना असुन , महसुल प्रशासनाचे या अवैद्य मार्गाने मोठया प्रमाणावर यावल शहरात व परिसरात विविध वाहनातुन विनापरवाना वाळुची चोरटी वाहतुक होत असून स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळुची तस्करी करणाऱ्यांना चांगलेच फावले असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Protected Content