Home Cities चाळीसगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावात पोलिसांचा रूट मार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावात पोलिसांचा रूट मार्च


chalisgaon root march

चाळीसगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१८) येथील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांचा रूट मार्च करण्यात आला.

 

भूषण मंगल कार्यालय ते देवरे हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, सिग्नल पॉईंट, बस स्टँड, भङगाव रोङ वरून पुन्हा भूषण मंगल कार्यालयापर्यंत हा मार्च काढण्यात आला होता. सदर रूट मार्चला सी.आय.एस.एफ.चे चार अधिकारी व ५८ कर्मचारी, शहर पोलीस स्टेशनचे चार अधिकारी व ३२ कर्मचारी, २२ होमगार्ङ, ट्रॅफिकचे एक अधिकारी व चार कर्मचारी हजर होते. सदर रूट मार्च सायंकाळी ५.३० ते ६.४५ वाजेदरम्यान घेण्यात आला.


Protected Content

Play sound