पोलिस भरतीचे विद्यार्थी आक्रमक; वयाची अट वाढवण्याची मागणी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सरकारतर्फे १९ जून पासून राज्यभरात १७ हजार ४७१ पदांसाठी पोलिस भरती करण्यात येत आहे. शासकीय पद मिळावे यासाठी लाखो विद्यार्थी पोलिस भरतीची राज्यभरात तयारी करत आहे. सरकारने २०२२-२३ मध्ये पोलिस भरती करणार असल्याचे सांगितले परंतु त्याची पूर्तता २०२४ मध्ये होत असल्याने विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा देखील पुढे जात असल्याने त्यांना भरती करण्याची संधी मिळत नाही. याचे निषेधार्थ पोलिस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत सरकार विरोधी घोषणाबाजी केली.

यावेळी विद्यार्थी म्हणाले, पोलिस भरतीकरिता उमेदवारांना वयाची अट वाढवून मिळावी. ज्या विद्यार्थ्यांनी लढा दिला त्यांचेच वय पोलिस भरतीत बसत नाही. आम्हाला एक संधी हवी आहे. मागील सात ते आठ महिने लोकप्रतिनिधी यांना आम्ही निवेदन देत आहे परंतु आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

महिलांना पावसाळ्यात मैदानी चाचणी देणे शक्य नाही. राज्यभरातील विद्यार्थी पुण्यात परीक्षा तयारी करण्यासाठी येतात. सर्वाची एकच मागणी आहे की, विद्यार्थ्यांना पोलिस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास एक संधी मिळावी. लोकप्रतिनिधी यांना वारंवार भेटून पोलिस भरतीची वयाेमर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी केली. परंतु त्याकडे लक्ष्य दिले गेले नाही लोकप्रतिनिधी हे याबाबत वरिष्ठ पातळीवरुन भरतीचे आदेश असल्याचे सांगत आहे. त्यामुळे हे आदेश देणारे नक्की कोण आहे याबाबतचा खुलासा झाला पाहिजे. गोरगरीबाच्या मताने सरकार सत्तेत येत असते. सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकीत विद्यार्थी देखील सरकारला धडा शिकवतील. सध्याची पोलिस भरती कायद्याला धरुन नाही अशी विद्यार्थी भावना नाही.

साडेचार लाख विद्यार्थी हे पोलिस भरतीसाठी तयारी करतात त्यापैकी वयाची अट पूर्ण होऊ शकत नसल्याने दीड लाख विद्यार्थी भरतीपासून वंचित रहाणार आहे. सरकारने २०२२-२३ मध्ये पोलिस भरती काढण्याचे आदेश दिले परंतु त्याची पूर्तता २०२४ मध्ये होत असल्याने सन २०२२-२३ मधीलच वयाेमर्यादा लागू केली पाहिजे. लाखो मुलांचे आयुष्याचा प्रश्न सरकारने मार्गी लावला पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे मुलांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. संधी भेटल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

Protected Content