जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील तीन अट्टल गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने स्थानबध्द केल्याची कारवाई केल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारांवर हद्दपारी आणि स्थानबध्द या कारवाया होत आहे. यात आता नव्याने एकाची भर पडली आहे. बुधवारच्या बाजारात हफ्ते मागणार्यासह समाजासाठी धोकादायक ठरणार्या तिघांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवशी तिघांना स्थानबद्ध करण्यात आले. तिघे रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार आहेत.
रामानंद नगर पोस्टे हद्दीत राहणारे एकुण ३ धोकादायक व्यक्ती नामे सचिन अभयसिंग चव्हाण रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा जळगाव, नितेश ऊर्फ गोल्या मिलींद जाधव रा. मढी चौक, पिंप्राळा जळगांव, व राहुल नवल काकडे रा. समता नगर जळगांव यांना स्थानबध्द करण्यात आले आहे.
यातील सचिन अभयसिंग चव्हाण वय २४ रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा जळगाव याचे वर रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे याचे वर ७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. यात दरोडा टाकणे, मारामारी, गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, अनधिकृतपणे घरात प्रवेश करुन मारहाण करुन खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे तसेच हिंदु मुस्लीम यासारखे अदखलपात्र स्वरुपाची पनाका तसेच गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्यावर त्याचे वर आयपीसी ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. तो नेहमी पिंप्राळा परीसरातील तसेच बुधवारच्या बाजारात सामान्य लोकांना धमकाऊन सांगत असे की, मी या एरीयाचा दादा आहे म्हणुन तुम्हाला मला हप्ता द्यावा लागेल अशा प्रकारे बुधवारच्या बाजारात दुकान लावनारे सामान्य लोकांकडुन प्रत्येकी २० रुपये प्रमाणे हप्ता वसुली करीत होता. जर कोणी त्यास हप्त्याचे २० रुपये देण्यास नकार दिला तर त्यांना मारहान करुन सामानाचे नुकसान करीत होता.
यासोबत, रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार धोकादायक इसम नामे नितेश ऊर्फ गोल्या मिलींद जाधव वय २४ रा. मढी चौक, पिंप्राळा जळगांव याचे वर रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे याचे वर १३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात त्यात खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणने, जबरी चोरी, घातक हत्यारानिशी दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा करुन घातक हत्यारानिशी गृह अतिक्रमण करुन मारहाण करणे, अश्लिल शिवीगाळ करणे असे गुन्हे दाखल असुन त्याचे वर कलम ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. तो पिंप्राळा परीसरातील दुकानदार पानटपरी चालक यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन त्यांच्या मनात त्याचेबाबत दहशत निर्माण करुन त्यांचेकडुन पैसे न देता सामान घेत होता.
रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार धोकादायक इसम नामे राहुल नवल काकडे वय २४ रा. समता नगर, जळगांव याचे वर रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे याचे वर १३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यात खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारानिशी गंभीर दुखापत करणे, दिवसा व रात्रीची घरफोडी करणे, चोरी करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे असे गुन्हे तसेच हिंदु मुस्लीम सारखे अदखलपात्र पनाका दाखल आहेत. त्याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६ (१) प्रमाणे हद्दपार करुन देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. तो नेहमी त्याचे कब्जात तलवार, चाकु, कोयता असे जीव घेणे हत्यार बाळगुन समता नगर परिसरातील नागरीकांना हत्यारांचा धाक दाखवुन सांगत असे की, मी या गल्लीचा दादा आहे. माझ्या नांदी लागाल तर, तुम्हाला जिवे ठार मारुन टाकेल अशा धमक्या देऊन त्याची दहशत निर्माण करीत होता.
तिन्ही धोकादायक इसमांवर कायद्याचा वचक राहावा व भीती राहावी तसेच त्यांच्या हातुन समान्य लोकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सदर इसमांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभुमी काढुन पोलीस अधिक्षक एन. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांचे मार्गदर्शन व मदत घेऊन धोकादायक इसम सचिन अभयसिंग चव्हाण रा. गुरुदत्त कॉलनी पिंप्राळा जळगाव, नितेश ऊर्फ गोल्या मिलींद जाधव रा. मढी चौक, पिंप्राळा जळगांव, व राहुल नवल काकडे रा.समता नगर जळगांव यांना एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे व मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
कार्यवाही करताना प्रामुख्याने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पो.हे.कॉ. संजय सपकाळे, पो.हे.कॉ. सुशील चौधरी, पो.हे.कॉ. सुनील दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) पो.ना. राजेश चव्हाण, पो.हे.कॉ. विजय खैरे, पोना हेमंत कळसकर, पो.ना. रेवानंद साळुंखे, पोना विनोद सुर्यवंशी पो. कॉ. रवींद्र चौधरी, पो. कॉ. जुलालसिंग परदेशी, पोकॉ/ इरफान मलिक व स्थानिक गुन्हे शाखा पो.कॉ.ईश्वर पाटील या सर्वांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या धोकादायक व्यक्तींच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन तिघांना स्थानबद्ध करणे बाबत महत्वाची भुमिका पार पाडली आहे.