बेकायदेशीर मद्यविक्रीवर पोलिसांचा छापा : एकास अटक

 

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील आस्थापना बंद करण्यासाठी पेट्रोलिंग दरम्यान ओझर गावाच्या पुढे चाळीसगाव ते भडगाव रोड लगत बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक वृत्त, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील आस्थापना बंद करण्यासाठी पेट्रोलिंग दरम्यान सहा पोलिस निरीक्षक विशाल टकले यांना गुप्तहेरांकडून ओझर गावाच्या पुढे चाळीसगाव ते भडगाव रोड लगत बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असल्याची माहिती सकाळी ११ वाजताच्या सुमारास मिळाली. लागलीच पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार सपोनि विशाल टकले, सफौ धर्मराज पाटील, चालक प्रकाश महाजन आदींनी सदर ठिकाणी दुपारी १२:३० वाजता छापा टाकला असता १२०० रुपये किंमतीच्या कॅनाॅन सुपर स्ट्राॅग बियरच्या ८ सिलबंद बाटल्या व २५० रूपये किंमतीचे ट्युबर्ग स्ट्राॅग बियरच्या २ सिलबंद बाटल्या असे एकूण १४५० रू किंमतीचे मद्यसाठा जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमित अंबादास सोनावणे (वय-२६ रा. घाटरोड, ता. चाळीसगाव ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास राकेश पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content