Home क्राईम रावेर तालुक्यात गांजाच्या शेतात पोलिसांचा छापा : परिसरात एकच खळबळ

रावेर तालुक्यात गांजाच्या शेतात पोलिसांचा छापा : परिसरात एकच खळबळ

0
41

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील लालमाती सहस्त्रलिंग नजिक गांजा पेरलेल्या शेतात पोलिसांनी छपा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, लालमाती सहस्त्रलिंग शिवार येथे बंदी असलेली गांजाची झाडे एका शेतात पेरल्याची माहीती पोलिस प्रशासनाला मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी सदर शेतात जाऊन छापा टाकला असता त्यांना शेतात लागवड केलेला गांजा आढळून आला. रात्री उशीरापर्यंत गांजा जप्त करून शेतातुन नष्ट करण्याचे काम सुरु होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल घटनास्थळी आपल्या टीम सोबत असून याबाबत उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound