Home क्राईम जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, तिघे ताब्यात; २ लाखांपेक्षा जास्त रोकड जप्त

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, तिघे ताब्यात; २ लाखांपेक्षा जास्त रोकड जप्त

0
259


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आव्हाणा शिवारातील हरिकृष्ण नगरात सुरू असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर तालुका पोलिसांनी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख २ लाख १४ हजार ५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी, २४ जुलै रोजी करण्यात आली.

या प्रकरणी जितेंद्र रामचंद कदम (रा. हरिकृष्ण नगर), संजय जनार्दन सपकाळे (५०, रा. शिवाजीनगर) आणि मयूर कैलास भावसार (३२, रा. इंद्रप्रस्थ नगर) यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिकृष्ण नगरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रामकृष्ण इंगळे, धनराज पाटील, दीपक चौधरी, पोलीस नाईक नरेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पाटील, तुषार जोशी आणि ज्योती साळुंखे यांच्या पथकाने हरिकृष्ण नगरात जाऊन छापा टाकला.

या छाप्यात, घटनास्थळी ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत जुगार खेळणाऱ्या जितेंद्र कदम, संजय सपकाळे आणि मयूर भावसार यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून मोठी रोकड आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे दिसून आले आहे.


Protected Content

Play sound