चाळीसगावात जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील सुवर्णाताई नगरात जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलीसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले असून १ हजार ८० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शहरातील सुवर्णाताई नगरात असलेल्या सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळाली, त्यानुसार ठाकूरवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार शैलेंद्र पाटील, निलेश पाटील, अमोल पाटील आणि विनोद खैरनार यांना घटनास्थळी कारवाईसाठी रवाना केले. पोलीसांनी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास छापा टाकून सुनील गोविंदा जाधव (वय 29, रा. आंबेडकर चौक), ऋषी प्रदीप गोयर (वय 28 रा.सुवर्णाताई नगर), रविंद्र मनोहर जाधव (वय 44, रा. आंबेडकर चौक), किरण सुरेश निकम (वय 29 रा. सुवर्णाताई नगर) आणि संदीप निंबा बोरसे (वय 26, रा.  सुवर्णाताई नगर) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1 हजार 80 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पो.कॉ. विनोद खैरनार यांच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content