जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथील बोरी नदीपात्रातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी (दि.१४) रोजी दुपारी अचानक छापा टाकत २ जणांना अटक केली. मात्र तीन जण फरार झाले असून पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना बहादरपूर येथील बोरी नदीपात्रात सबस्टेशनच्या मागे काही लोक जन्न-मन्ना नावाचा पत्ता जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे हवालदार रवींद्र रावते, विजयसिंह शिंदे, रवींद्र पाटील यांनी याबाबत सूचना केली. या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पत्ता जुगार खेळणाऱ्या वर छापा मारला असता त्याठिकाणी 4080 रु रोख 1500 हजार रुपये दोन मोबाईल व एक 25000 रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण 44,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून तीन जण मात्र फरार झाले आहेत. 

पोलीस शिपाई मोहसीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र भोई, आसाराम भोई, गोपाळ भोई व दोन फरार अश्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान शहरात देखील एका हॉटेलवर सर्रास पत्ता जुगार हा खेळविला जात आहे. त्याठिकाणी पोलिसांनी छापा मारून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

Protected Content