जळगाव (प्रतिनिधी) उत्कृष्ठ कामगिरीला प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलीस दल व पीपल्स पीस फांऊडेशन व त्रिमूर्ति फाउंडेशनच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील गुन्हे शाखा, वाहतुक शाखा, गोपनीय शाखा आदी विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस, अधिकारी, सरकारी वकील व साक्षीदार यांचा उत्कृष्ठ कार्यसन्मान सोहळा नियोजन भवनात आयोजित करण्यात आला होता.
जळगाव जिल्हा मुख्य न्यायाधीश गोविंद सानप, अप्पर पुलिस अधीक्षक लोहित मतानी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके ,त्रिमूर्ति फाउंडेशनचे मनोज पाटील व पिपल्स पीस फांउडेशनच्या अध्यक्षा मनजीत कौर मतानी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा पोलिस दलातील या उत्कृष्ट कार्य सन्मान सोहळ्यात जिल्ह्यातील १५० इतक्या पोलिस अधिकारी, सरकारी वकील व साक्षीदार यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांनी असे सांगितले की, असा कार्यसन्मान करण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. कामाचे कौतुक झाले की शाबासकी मिळते. आज मला खात्री आहे की, आपण कुटुंबातील सदस्याला वेळ देऊ शकत नाही. पोलिसांच्या कामाचे सन्मान झाले तर ते नक्कीच समाधानी राहतील. इंव्हीस्तीगेटर ऑफिसर म्हणून आपण प्रोत्साहित व्हाल. गुन्हे दोष सिद्ध चे करणे शोधली पाहिजे. न्यायालयाची यात काही भूमिका नाही. जेवढे पुरावे येतात त्यावर निकाल द्यावा लागतो. दोष सिद्धी वाढण्याची कारणे शोधावी. ५० % दोष सिद्धी वाढली पाहिजे. आज जवळपास २५ % वाढले तरीही मागील एसपी दत्ता शिंदे, अप्पर एसपी लोहित मतांनी यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. प्रलंबित प्रकरणांचा आम्ही अभ्यास केला. ज्या केसेस लांबत गेल्या त्याचा अभ्यास केला. त्यानुसार केसेसचा प्रोग्राम फिक्स ठरवत गेलो. त्यानुसार केसेस लवकर चालून निकाल लावणयास मदत झाली. जळगावातील हा प्रयोग राज्यात केला तर क्रिमिनल केसेस कमी होतील. साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्याशिवाय त्यांना न्यायालयातून परत जाऊ देतं नाही.आज न्यायालयातील कामकाजातील त्रुटी कमी केल्या आहेत. इ प्रणाली सिस्टिम आम्ही वापरली. विकसित केली असे सांगितले. . यासन्मान सोहळ्याची माहिती देतांना मनजीत कौर मतानी यांनी सांगितले की, उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलिसाचा उत्साह अधिक वाढवून त्यांची प्रभावी कामगिरी ने अतिउच्च पातळी गाठावी व इतर पोलिस कर्मचार्याना प्रोत्साहन मिळुन त्यांचीही कामगिरी अधिक प्रभावी व गतिमान व्हावी हा महत्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कार्यक्रमा दरम्यान, सन्माथीर्नी मनोगत व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्याची माहिती देतांना मनजीत कौर मतानी यांनी सांगितले की, उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलिसाचा उत्साह अधिक वाढवून त्यांची प्रभावी कामगिरी ने अतिउच्च पातळी गाठावी व इतर पोलिस कर्मचार्याना प्रोत्साहन मिळुन त्यांचीही कामगिरी अधिक प्रभावी व गतिमान व्हावी हा महत्वाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कार्यक्रमा दरम्यान, सन्माथीर्नी मनोगत व्यक्त केले.
पहा सरकारी वकील केतन ढाके, मनजीत कौर मतानी यांनी व्यक्त केलेले मत