गडचिरोली-लाईव्ह ट्रेंड न्युज वृत्तसेवा | गडचिरोली येथील भामरागड तालुक्यातील कतरनट्टा येथील जंगलात १३ मे रोजी सोमवारी पहाटेच्या सुमारासत पोलिस आणि माओवाद्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन माओवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. पेरमिली दलमचे नक्षली कतरनगट्टा येथील जंगल परिसरात आपला कॅम्प लाऊन पोलिसांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने बसले होते.
ही माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सी-60 या नक्षलविरोधी पथकाचे जवान शोध अभियानावर निघाले. अभियानादरम्यान पोलिसांच्य पथकाची चाहूल लागताच कॅम्प मधील नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. पेरमिली एलओएस कमांडर तथा विभागिय समिती सदस्य बस्तर निवासी वासु याच्यासह सह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. वासूवर १६ लाखांचे बक्षीस पोलिस विभागाकडून जाहीर केलेले होते. तर अद्यापही शोधमोहीम राबविली जात आहे.
कतरनट्टा जंगलात पोलिस-माओवादी यांच्यात चकमक; तीन माओवाद्याचा खात्मा
6 months ago
No Comments