रावेर प्रतिनिधी । शहरात रस्त्याच्या कडेला रहदारीस अडथळा निर्माण होईल असे वेगवेगळ्या वस्तू, फळे, भाजी विकणे करीता हातगाडी/लोटगाडी रस्त्यावर लावून उभे करणाऱ्या १२ जणांवर पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 102/117 प्रमाणे रावेर पोलीस स्टेशन ला गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सर्वांना कोर्टात हजर राहण्याची लेखी समज दिली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक,रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, PSI-मनोहर जाधव, पो, हवा गोपाळ पाटील, पो. महेंद्र सुरवाडे, पो. काँ. रुपेश तोडकर, पोकाँ. योगेश सावळे, पोकाँ.सुकेश तडवी, पोकाँ.कुणाल सोनवणे, होमगार्ड कांतीलाल तायडे,होम.राहुल जाधव अशांनी आंबेडकर चौक रावेर येथे करण्यात आली आहे.