जिल्हा पोलीस दलात खांदेपालट : सपोनी व पोलीस निरिक्षकांच्या नियुक्त्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात विविध पोलीस स्थानकांमध्ये २२ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून यात निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. एम. महेश्‍वर रेड्डी यांनी जारी केले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या जागी नवीन निरिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने सध्या एलसीबीचा कार्यभार असलेले पोलीस निरिक्षक बबनराव आव्हाड यांच्याकडे आता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची पुर्ण वेळ जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे. दीपक किसनराव बुधवंत हे नंदुरबार येथून पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन शाखेत रूजू होणार आहेत. दत्तात्रय युवराज निकम हे मुंबई लोहमार्ग स्थानकातून जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात बदलून आले आहेत. जिविशा सुरक्षा येथे कार्यरत असणारे महेश रघुनाथ गायकवाड हे भुसावळ तालुका पोलीस स्थानकाची धुरा सांभाळणार आहेत. तर धुळे येथून भुसावळ शहर येथे राहूल तुकाराम वाघ हे बदली होऊन आले आहेत. मुरलीधर माधव कासार हे नाशिक येथून जामनेर पोलीस स्थानकात रूजू होणार आहेत. तर बोदवड येथील राजेंद्र पंढरीनाथ गुंजाळ हे रामानंदनगर पोलीस स्थानकाची धुरा सांभाळणार आहेत.

नागपूर शहर येथे कार्यरत असणारे अरविंद विनायक भोळे हे बोदवड येथील पोलीस स्थानकाचा कार्यभार सांभाळणार आहेत. रामानंदनगरचे राजेंद्र कुटे यांना नियंत्रण कक्षाचे प्रभारी बनविण्यात आले आहे. धरणगावचे उध्दव डमाळे यांना आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे सायबर शाखेचे अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. नागपूर येथून पवन प्रतापराव देसले हे धरणगाव पोलीस निरिक्षकपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. जळगाव नियंत्रण कक्षात कार्यरत राहूल गायकवाड यांच्याकडे जळगाव शहर वाहतून शाखेचा प्रभार देण्यात आला आहे.

दरम्यान, यासोबत सहायक पोलीस निरिक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मुंबई शहर येथून सहायक पोलीस निरिक्षक विशाल पुंडलीक पाटील हे सावदा शहर पोलीस स्थानकात बदलून आले आहेत. विशेष सुरक्षा विभागाचे उमेश महाले यांना भुसावळ शहर वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप बापू एकशिंगे हे जालना येथून आले असून त्यांना चाळीसगाव वाहतूक शाखेची धुरा मिळाली आहे. चाळीसगाव ग्रामीणचे प्रवीण अजयसिंग दातरे यांना मेहुणबारे स्थानक मिळाले आहे. नशिराबादचे रामेश्‍वर दगडू मोताळे यांना फैजपूर स्थानक मिळाले आहे. फैजपूरचे निलेश नानाजी वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. एमआयडीसीचे आसाराम चिंतामण मनोरे यांना नशिराबाद स्थानकाची जबाबदारी मिळाली आहे.चोपडा शहराचे प्रशांत मधुकर कंडारे यांना पाळधी आऊटपोस्ट मिळाले आहे. मारवड येथील शीतलकुमार नाईक यांची ए.एच. टि. यू. जळगाव येथे बदली झाली आहे. तर धरणगाव येथील सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील यांना मारवड पोलीस स्थानकाचा कार्यभार मिळाला आहे.

बदली व नियुक्ती झालेल्या पोलीस निरिक्षक व सहायक पोलीस निरिक्षकांनी तातडीने आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक एम. महेश्‍वर रेड्डी यांनी दिले आहेत.

Protected Content