चोरीच्या दुचाकी व मोबाईलसह तीन संशयित पोलीसांच्या ताब्यात; एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी व मोबाईल चोरी करणाऱ्या धरणगाव शहरातून २ तर जळगाव शहरातून १ असे एकुण तीन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून १५ मिनीटांनी अटक केली आहे. तिघांकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे धरणगाव शहरातील आणि जळगावातील असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून १५ मिनीटांनी धरणगाव शहरातून संशयित आरोपी राजू भिमसिंग बारेला (वय-२३) आणि दिपक सुमऱ्या बारेला (वय-२९) दोन्ही रा. मधुकर नगर, धरणगाव यांना अटक केली. दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि एक मोबाईल हस्तगत केला. तर दुसऱ्या पथकाने संशयित आरोपी रमेश फुलसिंग देवरे (वय-२३) रा. श्रीकृष्ण लॉनी, जळगाव याला जळगावातून अटक केले. त्याच्याकडून १ चोरीचा मोबाइल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी धरणगावातील दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले तर जळगावातील चोरट्यांला एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.

यांनी केली कारवाई

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप साळवे, नितीन बाविस्कर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील आणि अशोक पाटील यांनी ही कारवाई केली.

 

Protected Content