जळगाव (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी फलाट क्र. ३ वर गोवा एक्सप्रेस गेल्यानंतर एका गरोदर महिलेची प्रसूति झाल्याची घटना घडली. या वेळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि सफाई कामगारांनी तिची माणुसकीच्या भावनेतून मोलाची मदत केली.
अधिक माहिती अशी की, सकाळी संबंधित महिला अवघडलेल्या अवस्थेत पतीसह फलाटावर असताना तिच्या पतीने पोलिसांना मदत मागितली, तेव्हा गौतम शेंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने व ए पी आय राळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगार महिलांची मदत घेऊन गेंदालाल मिल कडून डॉ. पाटील यांना बोलावून फलाटावरच तिची प्रसूति केली. सदर महिला व तिचे बाळ सुरक्षित आहेत. त्यानंतर पोलिसांनी अम्बुलंस आणून त्या महिलेला पुढिल उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस आणि सफाई कर्मचारी यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.