पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांच्या रहस्यमय हत्येप्रकरणी काल पंढरपूर येथून अटक करण्यात आलेल्या माजी सरपंच शेखर वाणी यांस आज जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याचा शोध लागल्यावरच या प्रकरणातील रहस्य समोर येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी सांगितले. तर दुसरीकडे आज अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पहूर पोलीस स्टेशन ला भेट देऊन तपास कामी माहिती जाणून घेतली.