पाचोरा प्रतिनिधी । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग, प्रशासन, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी बुद्ध श्रमजीवी फाउंडेशन, विरार (पश्चिम) या सेवाभावी संस्थेतर्फे आज विरार पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी विरार येथील पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना सन्मान पत्र व शाल देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बुध्दाय श्रमजीवी फाऊंडेशनतर्फे आधारस्तंभ संतोष वेखंडे, श्रावण घिवरे, डॉ. अरविंद पवार, प्रविण घाडवे, विकल्प खैरे, विश्वनाथ चौधरी सह बुद्धाय श्रमजीवी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या फाऊंडेशनचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे. तसेच कोरोना योद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.