Home क्राईम धारदार सुरा बाळगणाऱ्या तरूणाला पोलीसांकडून अटक

धारदार सुरा बाळगणाऱ्या तरूणाला पोलीसांकडून अटक

0
292


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर हुडको परिसरात घातक असलेला धारदार सुरा घेऊन फिरणाऱ्या एका तरुणावर जळगाव शहर पोलिसांनी शनिवारी ३ मे रोजी सकाळी कारवाई करत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर हुडको भागातील परिसरात संशयित आरोपी कल्पेश उर्फ बाळ्या देविदास शिंपी वय-२६ हा तरुण धारदार सुरा घेऊन परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी ३ रोजी सकाळी १०.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी कल्पेश उर्फ बाळ्या देविदास शिंपी याला अटक केली. त्याच्याकडून धारदार सुरा जप्त केला आहे. या संदर्भात रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.


Protected Content

Play sound