पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा पोलीस स्टेशन येथे आयोजित वार्षिक अहवाल तपासणी निमित्ताने ग्रामरक्षक दलाची पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी डॉ. मुंडे यांच्या हस्ते ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांना लाठी, सिटी व टी-शर्ट वाटप करण्यात आले.
पाचोरा येथे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पाचोरा पोलीस स्टेशन येथे वार्षिक अहवाल तपासून निमित्ताने आयोजित ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना लाठी, टी शर्ट व सिटी वाटप करण्यात आली असून कायदा सुव्यवस्था याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी अधिकाधिक पोलिसांना मदत करून सहकार्य करावे, व कुठलीही संकल्पना जर यशस्वी करायची असेल तर काम करण्याची जिद्द मनापासून ठेवावी लागते आपण ग्रामरक्षक दलाचे सदस्य झाले.
याबाबत आपले अभिनंदन आपल्याकडून पोलिसांना मदत करण्याचे हेतूने कार्य होईल अशी अपेक्षा बाळगतो. त्याचबरोबर पाचोरा तालुक्यातील पुनगाव आणि खडकदेवळा या दोन्ही गावातील ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी अतिशय उत्तम काम करत पोलिसांना सहकार्य करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबाबत देखील पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी सदर ग्राम रक्षक दलाच्या सदस्यांचा सन्मान केला व कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर ठेवली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मदतीला ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व सामान्य नागरिक हे नेहमी पोलिसांचे कान, नाक, डोळे, हात म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून गावातील सुरक्षेचे काम आपण करीत आहेत. त्याचबरोबर ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून गावात होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या देखील थांबतील व यावर अंकुश बसेल असे मला वाटते.
यावेळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन- पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौभे तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पाचोरा तालुक्यातील पोलिस पाटील व ग्राम रक्षक दलाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी.एन. चौधरी व प्रा. शिवाजी शिंदे यांनी केले.