जळगाव, प्रतिनिधी | येथील डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात आज (दि.२९) पोळा व मातृ दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सुनील वाघ यांनी पोळा व मातृ दिनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. छोटू पाटील व गजानन कोळी यांनी शेतकरी गीत सादर केले. योगेश जोशी यांनी ‘आई अमोल माया’ हे गीत सादर केले. तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांनी मातृ दिनानिमित्त आईस चिट्ठी हा उपक्रम केला. या मुलांनी आपल्या आईला चिट्ठी लिहून, आई विषयी आपले मनोगत मांडले. मुख्याध्यापिका सौ. योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.