अखेर ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात संशयितावर पोक्सोचा गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा परिसरातील सतरा वर्षीय अल्पवयीन फुस लावून पळवून नेत अत्याचार प्रकरणी संशयित आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव शहरातील तांबापूरा भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपी विशाल भोई रा. जळगाव याने फुस लावून पळवून नेले होते. दुसऱ्या दिवशी २० जुलै २०२० रोजी जळगावातील मेहरूण तलावात बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात संशयित आरोपी विशाल भोई याच्या विरोधात भादवि ३०५, ३२३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर प्रकरणी मयत अल्पवयीन मुलीची आई सुफीया बी फिर्यादी आहे. तिने आपले बंधू आसिफ शाह , पती भिकन शाह व बहीण शमीम शाह च्या सोबत मानियार बिरदारीचे फारूक शेख यांच्याकडे सदर प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावण्यासाठी रोज तगादा करीत होते व त्यानुसार शेख हे शवविच्छेदन करणारे डॉक्टर, सीसीटीव्ही फुटेज, चौकशी अधिकारी सपोनी राऊत, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधीत असल्याने शेवटी २८ दिवसात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर संशयित आरोपी विशाल भोई विरुद्ध भादवी ३०५, ३२३, ३६३, ३७६ सह पोक्सो कलम ४, ५, ६, ८ व १२ लावण्यात आले.

वेळोवेळी यांचे सहकार्य मिळाले
फारुक शेख यांनी सुद्धा सदर प्रकरणी जळगाव शहरातील प्रतिभा शिंदे, गफ्फार मलिक, करीम सालार, बशीर बुऱ्हानी व खास करून तांबापुर परिसरातील हनीफ शहा बापू , आसिफ शाह, मुख्तार शाह, साबिर शाह, वसीम बापू, जमील शेख, अनिस शहा, जुलकर नैन, अनवर खान, अझीझ सिकलीगर, इरफान नूरी, फारूक कादरी, अयाझ अली, यांच्यासह वेळोवेळी पोलीस अधिकारी यांना भेटून निवेदने दिली व चर्चा केली होती.

यांचे मानले आभार
पोलीस तपास जरी पॉलिसांचे कर्तव्य असले तरी ३२ दिवसात तपास अंतिम चरणी आणून मयत अल्पवयीन गरीब मुलीस न्याय मिळवून दिला म्हणून फारुक शेख यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांचेसह पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर , चौकशी अधिकारी सपोनि राऊत सुद्धा आभार मानले. रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन दोघी अधिकाऱ्यांचे शाल देऊन फारूक शेख, बशीर बुऱ्हानी, अनिस शाह व जुलकर नैन यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Protected Content