धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदे येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध घेतले होते. त्यांच्यावर जळगाव येथील जिल्हा शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचारा सुरू असतांना उचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष दशरथ चव्हाण (वय-५४) रा. सावदे ता. एरंडोल जि.जळगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष चव्हाण हे आपल्या परिवारासह सावदे येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता ते त्यांच्या शेतात असतांना त्यांनी पिकांवर फवरण्यासाठी लागणारे विषारी औषध सेवन केले. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांनी तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.