जळगाव प्रतिनिधी । शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी नगरातील अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने एम.जे. कॉलेज समोरील रेड प्लस येथे आज रविवारी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना महामारीच्या काळात संपुर्ण देशात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रूग्णांना रक्तापुरवठा होण्यासाठी अनेक संघटनांनी पुढे येवून तरूणांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले जात असून रक्तदान शिबीरे घेण्यात येत आहे. दरम्यान आज शहरातील एम.जे.कॉलेजसमोरील रेड प्लस ब्लड बँकेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन महाराणा प्रतापसिंह आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिध्देश्वर लटपटे यांनी अभिवादन करून शिबीराला सुरूवात केली. रक्तदान शिबिराला तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व चागल्या प्रमाणात तरुणांनी रक्तदान केले आणि हे दर्शवून दिले की माणसातली माणुसकी अजून शिल्लक आहे.
रक्तदान शिबीर यशस्वितेसाठी महानगर सहमंत्री सोहम पाटील ,नगर मंत्री आदित्य नायर, नगर सहमंत्री संकेत सोनवणे, पवन भोई ,आकाश पाटील, विपुल बिराडे, विपुल अत्तरदे, भूपेंद्र बानाईत, अल्पेश पाटील, दुर्गेश वर्मा आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.