Home उद्योग अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलन

अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलन


जळगाव (प्रतिनिधी) आज १० फेब्रुवारी रोजी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संध्याकाळी भाऊंच्या उद्यानात मुशायरा (कविसंमेलन) चे आयोजन करण्यात आलेले आहे.

अशोकभाऊ जैन यांच्या ५६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सायंकाळी ५.३० वाजता भाऊंच्या उद्यानात मुशायरा( कविसंमेलन) चे आयोजन जळगाव जिल्हा मनियार बिरादरी व अमृत धारा यांच्या सयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या मुशायऱ्यात जळगावातील नावाजलेले कवी-शायर हे सह्भागी होणार आहेत. सदर मुशायरा सर्वासाठी खुला असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख व अमृत धाराच्या अध्यक्षा डॉ. प्रियांका सोनी यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound