कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात फिरते लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात फिरते लसीकरण केंद्रातर्फे लसीकरण शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्याहस्ते आज २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले. आज दिवसभरात विद्यापीठातील २०० व्यक्तींना लस देण्यात आली. अशी माहिती प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार उपस्थित होते. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव एस.आर.भादलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.के. एफ. पवार, विद्यापीठ उपअभियंता आर. आय. पाटील, विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना सांगळे  हे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना रंजना पाटील यांनी लस घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. कोणतेही गैरसमज करुन न घेता लस घ्यावी असे आवाहन केले. प्रा. बी.व्ही.पवार यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाच्या वतीने हे पाचवे लसीकरण शिबिर होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. यावेळी विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ठेकेदाकडील दैनिक वेतनिक, सुरक्षा रक्षक आदींना कोरोना विषाणूचा प्रतिबंधक कोविशील्डचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी फिरते लसीकरण केंद्राचे आरोग्य सेवक प्रशांत पाटील, सपना नन्नवरे, सरला सपकाळे, प्रीती निकम  यांनी सहभाग घेतला. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ.सोमनाथ वडनेरे, अक्षय बागुल, बलभिम गिरी, प्रशांत पाटील, मयुर पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण सपकाळे, एस.बी.पाटील, सुभाष पवार, राजू सोनवणे, महेश मानेकर आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content