Home Uncategorized कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्री-पीएच.डी. कोर्सवर्कचा प्रारंभ

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्री-पीएच.डी. कोर्सवर्कचा प्रारंभ


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पेट २०२४ मधील विद्यार्थ्यांसाठी प्री -पीएच.डी. कोर्सवर्कचा प्रारंभ आज शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रोजी करण्यात आला. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एकूण ९२% संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत, कोर्सवर्क अध्यक्ष व अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, प्रा. भुषण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्र-कुलगुरू यांनी विद्यार्थ्यांना संशोधनविषयांची निवड करतेवेळी सामाजिक समस्या तसेच नवनवीन शोध यासंदर्भात आवश्यक असणारे विषय निवडावेत आपल्या संशोधनाचे पेंटट होईल असे दर्जेदार समाजपयोगी संशोधन करावे असे आवाहन केले.

या प्रसंगी प्राचार्य एस.एस. राजपूत व प्रा. अनिल डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संशोधन विभागाचे सहा. कुलसचिव (अ.का.) प्रवीण चंदनकर यांनी केले. या कोर्सवर्क करीता प्रा. प्रशांत सोनवणे हे समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील सर्व विषय व विधी विषयासाठी दि. ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. एकूण ३१५ विद्यार्थ्यांपैकी २८७विद्यार्थी उपस्थित होते. सकाळ सत्रात प्रा. भूषण चौधरी यांचे तर दुपार सत्रात प्रा.दिपक दलाल व प्रा.एम.झेङ चोपडा यांनी मार्गदर्शन केले. संशोधन विभागातील कर्मचारी संजय ठाकरे, सुनील अढाव, ललित काटकर, यशवंत शिसोदे, श्रावण पाटील, मनोहर पाटील, शुभम धुमाळ, नरेंद्र तायडे, पियुष भावसार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.


Protected Content

Play sound