यावल प्रतिनिधी । येथील शायर आसीफ ब्यावली ( हाजी शेख मुनाफ शेख ) यांचे वृध्दापकाळाने ईदच्या दिवशी निधन झाले.
यावल शहरातील बुरुज चौक, खिर्नीपुरा या परिसरातील रहिवासी हाजी शेख मुनाफ शेख अब्दुल वय ७७ यांचे रमजान ईदच्या दिवशी वृध्दापकाळाने निधन झाले. जुन्या काळातील शायर (कवी) आसीफ ब्यावली म्हणुन ते प्रख्यात होते. त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सागर हार्डवेअरचे मालक शेख अकील यांचे वडील होत.