चाळीसगाव (प्रतिनिधी) विविध मागण्यांसाठी येथील पंचायत समिती सभापती, उपसभापतीसह पंचायत समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी आज राजीनामे दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, पंचायत समिती सदस्यांना स्वतंत्र विकास निधी मिळावा व जास्तीचे अधिकार मिळावे, मानधन भत्ता, वाढवून देण्यात यावा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे पूर्ण आधिकार प्रधान करण्यात यावे, 14 वा वित्त आयोगाचा निधी पंचायत समिती सदस्यांना पण देण्यात यावा, पंचायत समिती सदस्यांना प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीमध्ये घेण्यात यावा, पुर्वी प्रमाणेच कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सदस्यांना घेण्यात यावे, एसटी बसमध्ये पंचायत समिती सदस्यांना मोफत पास देण्यात यावी, पंचायत समिती या जिल्हा परिषदेतील दुवा असून अनेक ग्रामीण भागातील समस्या सोडवण्याचे मुख्य केंद्र पंचायत समिती असली पाहिजे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान,यासंदर्भात गुरुवारी (दि. 27 जून) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, पंकजाताई मुंढे यांच्यासोबत मुंबई येथे एका बैठकीचे आयोजित देखील करण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर सभापतील स्मितल दिनेश बोरसे, उपसभापती संजय भास्करराव पाटील, गटनेते अजय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.