Home Cities जळगाव पंतप्रधान मोदींचे विमान उतरणार जळगावात

पंतप्रधान मोदींचे विमान उतरणार जळगावात

0
33

जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांच्या उदघाटनानासाठी धुळे येथे दि.१६ फेब्रुवारीला येत आहेत. परंतु धुळ्यात विमानतळ नसल्यामुळे मोदी यांचे विमान जळगावात उतरून त्यानंतर ते हेलीकॉप्टरने धुळ्याला रवाना होणार आहेत. या संदर्भात जळगाव पोलीस दल, महसूल व विविध गुप्तचर यंत्रणांनी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचा आज आढावा घेतल्याचे कळते.

या संदर्भात अधिक असे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी दि.१६ फेब्रुवारी रोजी धुळ्यात येत आहेत. त्यात सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजना तसेच मनमाड-धुळे-इंदूररेल्वे मार्गाचा समावेश आहे. यावेळी मोदी यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभेच्या नियोजित सभेच्या जागेची धुळे प्रशासनातर्फे नुकतीच पाहणी देखील करण्यात आली आहे. परंतु धुळ्यात विमानतळ नसल्यामुळे मोदी यांचे विमान जळगावात उतरेल व त्यानंतर ते हेलीकॉप्टरने धुळ्याला रवाना होणार आहेत.

आज सकाळपासून जळगाव पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी,महसूल व विमान प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी विमानतळाची पाहणी करत. मोदी यांच्या संभाव्य दौर्‍यासंबंधी सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केल्याचे वृत्त आहे. आज सकाळपासूनच जळगाव विमानतळावर विविध विभागाचे अधिकारी आपापल्या पद्धतीने तयारी करीत होते. दरम्यान, या संदर्भात महसूल प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound