नवी दिल्ली वृत्तसंस्था । आजपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत असतांना पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये कोरोनाची लस टोचून घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी सकाळी साडेसहाच्या सुमारास एम्समध्ये कोरोनाची लस टोचून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना यांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस टोचून घेतली. अंतिम टप्प्याच्या चाचण्या होण्यापूर्वीच या लसीला मान्यता मिळाल्याने कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेतविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.