नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला दिग्गजांची हजेरी असणार आहे. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी थोड्या थोडक्या नाही तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये इतर देशातील राष्ट्रपती,पंतप्रधान यासह सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
LIVE : नरेंद्र मोदी यांनी घेतली दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ
6 years ago
No Comments