नवी दिल्ली प्रतिनिधी । चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून (दि.11) दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथे भेट होणार आहे. त्यासाठी 500 सीसीटीव्ही कॅमेरा आणि 10 हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख्यांमध्ये या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
जिनपिंग तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथे येणार असल्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी 500 सीसीटीव्ही कॅमेरा आणि 10 हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे महाबलीपुरमला अगदी लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. जिनपिंग यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जागोजागी तब्बल 500 कॅमेरांच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी 9 आयएएस अधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागांच्या 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे के राष्ट्रपती शी जिनपिंग मामल्लपुरम (महाबलीपुरम) येथे अनौपचारिक भेट घेतील. जिनपिंग 11-12 ऑक्टोबरदरम्यान भारत दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते महाबलीपुरममध्ये पंतप्रधान मोदींसोबत दुसरी अनौपचारिक शिखर बैठक करतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जिनपिंग मोदींसोबत बैठकीनंतर चेन्नईचा दौरा करणार असल्याचे सांगितले.