Home Cities अमळनेर आ. शिरीष चौधरींचा लाभार्थ्यांना सुखद धक्का

आ. शिरीष चौधरींचा लाभार्थ्यांना सुखद धक्का

0
41
shirish chaudhari amalner in meeting

shirish chaudhari amalner in meeting

अमळनेर प्रतिनिधी । आ शिरीष चौधरी यांनी निराधार योजनेची तब्बल २७८६ प्रकरणे एकाच बैठकीत जागेवर मंजूर करून लाभार्थ्यांना सुखद असा धक्का दिला.

संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांची बैठक आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ही बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत प्राप्त झालेली सर्व प्रकरणे येथेच मंजूर झाली पाहिजेत अशा सूचना आमदार चौधरी यांच्या असल्याने त्यादृष्टीने प्रशासन देखील सज्ज झाले होते. या बैठकीत संजय गांधी योजना ३४०, श्रावण बाळ योजना २०२२, इंदिरा गांधी योजना ४२४ असे एकूण २७८६ प्रकरणे मंजूर करण्यात आल्या. विशेष म्हणजे प्राप्त झालेली काही प्रकरण अपूर्ण असतील किंवा त्रुटी असतील त्या जागेवरच पूर्ण करून मंजूर करण्यात आले. बैठकीत आमदार शिरीष चौधरी यांच्यासह तहसीलदार ज्योती देवरे व संबंधित अधिकारी तसेच समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.

दरम्यान निराधार योजनेची प्रकरणे मंजूर करण्यासाठी अनेक जण दलालांच्या कचाट्यात येत होते,यामुळे अनेकाना आर्थिक भुर्दड देखील बसत होता. काहींची फसवणूक होण्याचे प्रकार देखील घडत होते,सर्वसामान्यांची ही लूट थांबविण्यासाठी आमदार चौधरी यांनी ही बैठक लावून संबधित लाभार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या असल्याने अर्ज सादर करणारे सर्व लाभार्थी आवर्जून राहिले आणि आमदारांनी देखील त्यांच्या समक्ष सर्व प्रकरणे मंजूर करून आपण खरे लोकसेवक असल्याचा प्रत्यय जनतेला दिला.एवढ्या मोठ्या प्रमाणात निराधार योजनेची प्रकरणे एकाच बैठकीत पहिल्यांदाच मंजूर होत असून यामुळे आ चौधरींचे विशेष कौतुक होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound