भुसावळ (प्रतिनिधी) नागपूर येथे होणाऱ्या २ ते ४ ऑगस्ट दरम्यान १६ वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्यपद टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी सराव शिबिरात कसून सराव करून अजिंक्यपद स्पर्धा पटकावणारच या इराद्याने घाम गाळत आहेत.
ईगल क्रीडा संकुल वर दोन दिवसीय सराव शिबिरात जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी असह्य उकाळ्यात कसून सराव केला. स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच व जिल्ह्याचा नावलौकिक करण्याचा खेळाडूंनी निश्चय केला आहे. नागपूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३५ जिल्ह्यांचे संघ सहभाग घेणार असून खेल मंत्रालयाची मान्यता व शालेय क्रीडा महासंघाची मान्यता असलेल्या या खेळासाठी अजिंक्यपद पटविण्यासाठी सर्व संघ प्रयत्नशील आहे. जळगाव जिल्ह्याने सन २०१४ नाशिक,२०१५ अमळनेर,२ ०१६ मुंबई या तीन वर्ष सलग अजिंक्यपद स्पर्धा पटकावलेली आहे.
जिल्ह्यातील खेळाडूंना विशेष करून ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळावी याकरिता जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल खेळाडूंना मार्गदर्शन करीत असून प्रतिक कुलकर्णी, चेतन वानखेडे, तारीख अहमद ,वसीम शेख ,राहुल कोळी, यांच्या प्रशिक्षणात खेळाडू मेहनत घेत आहे.