जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात युवसेनेच्या वतीने शहरातील शास्त्री टॉवर चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत थाली बजाओ आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दरवाढ मोठ्या प्रमाणावर केली आहे. इंधन दरवाढीने सर्व सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तसंच, वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन सर्वच स्तरावरून मोदी सरकार व भाजपावर टीका केली जात आहे. याच महागाईच्या मुद्द्यावरून आता युवासेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वाढत्या महागाईच्याविरोधात उठवला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात ‘थाली बजाओ’ आंदोलन युवासेनेच्यावतीने करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगावातील शास्त्री टॉवर चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत थाली बजाओ आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख पियुष गांधी, युवासेना महानगरप्रमुख विशाल वाणी, विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी अंकित कासार, ए.आय. सपकाळे, उपमहानगरप्रमुख सागरभाऊ हिवराळे, चेतन कापसे, संकेत कापसे, अमोल मोरे, अभिजित रंधे, जय मेहता, यश सपकाळे, गिरीश सपकाळे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.