सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा शहरात स्वच्छतेसाठी 14व्या वित्त आयोगातर्गत आस्था स्वयंरोजगार संस्था या मक्तेदारला तीन वर्षासाठी ठेका देण्यात आला. या माक्तदाराने सावदा शहराला हागनदारी मुक्त करणे गरजेचे असताना मक्तेदार शहरातील स्वच्छते कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तसें निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,अभियानांर्गत सावदा शहराला “हागंणदारी मुक्त” करणे गरजेचे आहे. पंरतु तसे न होता शौचालयाची नियमीतपणे साफसफाई होत नाही, शौचालयाच्या स्वच्छ भिंती आणि फरशी नाही, सफाईसाठी आवश्यक सर्व साहीत्य, रसायने यांचा वापर केला जात नाही, पेपर नॅपकीन, हॅण्ड ड्रायरवी उपलब्धता नाही, शौचालयाच्या आजुबाजूचा परिसर सुस्थितीत नाही, शौचालयावर जाहीरात नाही, शौचालयाच्या बाहेरील आणि आतील बाजुस पुरेसा प्रकाश व्यवस्था नाही तसेच लेडीज टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकीनासाठी वेंडीग मशिन नाही, तक्रार करणेसाठी तक्रार रजिष्टर नाही.
तसेच शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयातील मैलावे योग्यरीत्या उपसा केला
जात नसल्याने सर्व शौचालय मैलाने भरून वाहत आहे. त्याकरीता सावदा शहरातील शौचालयाची नियमीतपणे साफसफाई, देखभाल दुरुस्ती होत नसल्याने शहरातील नागरीक उघड्यावर शौचालयास बसत आहे. तरी सदरील मक्तेदार हे शासनाचे मार्गदर्शक तत्तवे व मापदंडे यांचे योग्य अनुपालन करतांना दिसुन येत नाही व सावदा परिषदेचा ODF++ हा दर्जा फत्त कागदोपत्रीच दिसुन येत आहे व आकांक्षी शौचालयाचे उद्दीष्टे साध्य होतांना दिसुन येत नाही.
म्हणुन महोदय मी सावदा शहराचा एक सामान्य नागरीक म्हणुन सावदा शहराला “हागंणदारी मुक्त” करणेसाठी व्याय मांगत आहे की, संबंधीत मक्तेदारास जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्थापित करण्यात यावी. अन्यथा “स्वच्छ भारत अभियानाचे” उद्दीष्ट कधीच साध्य होणार नाही असे म्हटले आहे. निवेदनावर चाळीस ते पन्नास नागरिकांच्या सह्या आहेत.