प्लाझ्मा ठरू शकते कोरोनावरील सर्वात मोठे औषध – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । प्लाझ्मा हे कोरोनावर सर्वात मोठे औषध होऊ शकते. त्यासाठी प्लाझ्मा दानाकरिता कोरोनामधून बरे झालेल्यांनी पुढे यावे, स्वतःचे आरोग्य स्वतः:च्या हाती हे लक्षात घेऊन वेळोवेळी तपासण्या करून घ्याव्या तसेच जागतिक शाकाहार दिनानिमित्त शाकाहार सर्वोत्तम आहार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. श्री जैन युवा फाउंडेशन, रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे जागतिक शाकाहार दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री जैन युवा फाउंडेशन, रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे जागतिक शाकाहार दिनानिमित्ताने दरवर्षी शाकाहार रॅली काढण्यात येते. यंदा कोरोनामुळे रॅली ऐवजी प्लाझ्मा दान शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी  मेमन, सचिव विनोद बियाणी, श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ललवाणी, सचिव रितेश पगरिया, कोषाध्यक्ष अमोल फुलफगर मंचावर उपस्थित होते. 

यावेळी प्लाझ्मा दान करणाऱ्या सचिन बरडिया व योगेश पाटील या दोन व्यक्तींचा प्रातिनिधिक सत्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की , कोरोनाच नव्हे तर अनेक दुर्धर आजारात विविध तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. तरुणांनी देखील यासाठी पुढाकार घेऊन चाचण्या करून योग्य वेळी निदान करून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. यासाठी जनजागृती महत्वाची असून सामाजिक संस्थांचे योगदान व पुढाकार महत्वाचे आहे. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करावा लागेल. स्वतः च्या हाती स्वतः चे आरोग्य असून दक्ष जरी राहिले तरी आजार दूर ठेवता येतात, असेही ते म्हणाले. 

महाशिबिरात एकूण ५५ जणांनी प्लाझ्मा दान केले. सूत्रसंचालन रितेश पगारिया यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री जैन युवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष आनंद चांदीवाल, कार्याध्यक्ष पियुष संघवी, सहसचिव पारस कुचेरिया, सह कोषाध्यक्ष प्रतीक कावडीया, जनसंपर्क अधिकारी प्रवीण छाजेड, कार्यकारिणी सदस्य मनोज लोढा, प्रवीण पगारिया, सचिन राका, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, अनिष  चांदीवाल, चंद्रशेखर राका, दर्शन टाटीया, सौरभ कोठारी, राहुल बांठिया, रितेश छोरीया, प्रणव मेहता, अमोल श्रीमाळ, संदीप सुराणा यांच्यासह रेडक्रॉस सोसायटीचे उज्ज्वला वर्मा, डॉ, पी.बी. जैन, डॉ. ए.एन. चौधरी आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3393771080660494

 

 

Protected Content