जळगाव, प्रतिनिधी । कोरोना मुक्त झालेल्या व्यक्ती द्वारे संकलित झालेल्या प्लाझ्माव्दारे जे रुग्ण कोरोना बाधित असून गंभीर अवस्थेत आहे त्यांच्यावर प्लाझ्मा देऊन उपचार केले जाणार आहे. याथेरपी उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या कोरोनामुक्त झालेल्या दाते यांनी आज प्लाझ्मा दिला.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे व बाधित रुग्ण आहेत त्यावर प्रभावी उपचार करण्याच्या दृष्टीकोनातून प्लाझ्माफेरेसीस थेरपी हे रामबाण सिद्ध होईल व रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय वाढ होईल अशी आशा करुया असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रेडक्रॉस कडून भावना व्यक्त केल्या जात आहे. रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी प्लाझ्माफेरेसीस थेरपीची पध्दत कालावधी प्रक्रियाबाबत माहिती दिली यावेळी उपस्थित असलेले जिल्हा प्रशासनाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. यावेळी रेडक्रॉसचे पदाधिकारी – उपाध्यक्ष गनी मेमन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जलगावचे सिविल सर्जन डॉ. नागोराव चव्हाण, डॉ. विजय गायकवाड, डॉ. लीना पाटील डॉ. बडे, डॉ. सुशिल गुजर उपस्थित होते.