चाळीसगाव प्रतिनिधी । येथील ढोमने गावाला आज 2 ऑगस्ट रोजी कृषी विभागामार्फत 3 हजार 500 वृक्ष देण्यात आली असून विविध ठिकाणी या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, ‘एक दिवस भविष्यासाठी’ या उपक्रम ढोमणे ग्रामपंचायत मार्फत आयोजित करण्यात आला होता. विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली. तसेच वृक्ष लागवड व संवर्धनाचे मानवी जीवनातील महत्वाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती ही करण्यात आली. त्या अनुषंगाने कृषी सहाय्यक दांडगे साहेब, अ.राठोड, कृषी विस्तार अधिकारी र.गधरी, ग्रामसेवक य.आर.पाटिल, किशोर पाटिल (ढोमणेकर), ग्रामपंचायत सदस्य वासुदेव पाटिल तसेच जिल्हा परिषद शाळा येथील देसले सर, किशोर सोनवणे, योगेश पाटिल, रविंद्र मोरे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम बरकू आदी उपस्थितीत होते.