यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली येथील गावात शेतकरी बांधवांच्या हितासाठी विविध उपक्रम अग्रेसर असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील विविध ठीकाणी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या राष्ट्रीय अभियांनाअंतर्गत ५१ विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावल तालुक्यातील कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या माध्यमातून गावातील स्मशानभुमी, कोरपावली सातोद मार्गावरील रस्त्याच्या कडेला, विकास सोसायटीच्या आवारात ५१ विविध जातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राकेश वसंत फेगडे, सोसायटीचे संचालक एकनाथ चिंधू महाजन, सुधारक प्रल्हाद नेहते, यशवंत निंबा फेगडे, राजेन्द्र पाटील, तुळशीदास कोळंबे, विकास सोसायटीचे सेक्रेटरी मुकुंदा तायडे,सोसायटीचे सर्व संचालक यांच्यासह गावातील शेतकरी ,ग्रामस्थ, सामाजीक कार्यकर्ते मोठया संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.