
यावल( प्रतिनिधी) येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस वसाहतीच्या परिसरात १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे जनक शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी आणि एतिहासीक निर्णय घेणारे स्व. वसंतराव नाईक यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. यानिमित्त यावल पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस वसाहतीच्या परिसरात विविध जातीच्या वृक्षांची लागवड यावलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी गणेश मनुरे, प्रमोद लोने, मुजफ्फर पठान, योगेश खडके, युनुस तडवी, जयंता चव्हाण, मेहबुब तडवी आदी उपस्थित होते.